rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आईने मोजलेच नाही...

mother's day poem in marathi
, मंगळवार, 14 ऑक्टोबर 2025 (12:02 IST)
आईने मोजलेच नाही...
आयुष्याच्या तव्यावरती
संसाराची पोळी
भाजता भाजता
हाताला किती बसले चटके
आईने मोजलेच नाही...
 
नवर्‍यासह लेकराबाळांचे 
करता करता
मोठ्यांचा मान राखता राखता
कितीदा वाकले गेले,
आईने मोजलेच नाही...
 
बाळाला किती झोके
दिले,
बाळा साठी किती रात्री
जागले
आईने मोजलेच नाही...
 
जरा चुकले की 
घरच्यांची,बाहेरच्यांची
किती बोलणी खाल्ली,
काळजाला किती घरं पडली,
आईने मोजलेच नाही...
 
याच्यासाठी त्याच्यासाठी
आणखीही कुणासाठी
जगता जगता ,
स्वतःसाठी अशी 
किती जगले,
आईने मोजलेच नाही...
 
पाखरे गेली फारच दूर
डोळा आहे श्रावणपूर
पैशाचा हा नुसता धूर
निसटून गेले कोणते सूर,
आईने मोजलेच नाही...
 
सर्व आईंना समर्पित...
 
-सोशल मीडिया

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दिवाळीला बनवा पारंपरिक महाराष्ट्रीयन पोह्याचा चिवडा पाककृती