Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठी कविता : वसुंधरे तुझं रूप हे विलोभनीय

shrawan sari
, मंगळवार, 19 जुलै 2022 (17:22 IST)
वसुंधरे तुझं रूप हे विलोभनीय,
बघता आनंद मनास होतो स्वर्गीय,
नेसली तू शालू, हिरव्यागार अंगावर,
खुललं रूप तुझं ग, करतो मनास बावर,
रूप तुझें वेगळी वेगळी, काय त्यास वर्णावे,
स्वागतास श्रावणाच्या तू हीआहेस आणि काय हवे?
आसुसले तुझे ही मन, भेटण्यास अधीर,
येईल नटखट श्रावण, जरा धर धीर,
मग होईल सुरू खेळ, ऊन पावसाचा,
खरा हाच स्वभाव मनस्वी, माझ्या सख्या चा!
आला तो की फिरू आपण सवे रानोवनी,
होऊ धुंद, रंगू त्याच्याच रंगात,आंदपर्वणी!
 
....अश्विनी थत्ते

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आले फक्त सर्दीमध्येच नाही तर मधुमेहावरही फायदेशीर आहे, रोज सेवन करणे राहील फायदेशीर