Publish Date: Tue, 29 Jun 2021 (16:08 IST)
Updated Date: Tue, 29 Jun 2021 (19:11 IST)
तिला माझ्या कविता आवडतात ,
आणि मला कवितेतली ती
कवितेत ती स्वतःला शोधते ,
आणि मी तिच्यात कविता शोधतो
कळत नकळत शब्द जुडतात
भावना अलगद स्पर्श करतात
तिला कवितेतला साधताना भावतो
तिचा कवितेतला भाव मला बराच काही सांगतो
कवितेत न कळत ती हरवून जाते
शब्दात माझ्या ती गुंतून राहते
तिच्या वाचण्याने मिळे कवितेला स्वर
शब्द लेखणी वरून वाहती ओठांवर
अर्थ लाभतो कवितेस तेव्हा
हसू येई तिच्या गाली जेव्हा..!!!