Publish Date: Thu, 16 Jun 2022 (14:13 IST)
Updated Date: Thu, 16 Jun 2022 (14:15 IST)
खूप काही खाल्लं आहे या मोबाइलनं
याने हाताचं घड्याळ खाल्लं
याने टॉर्च-लाईट खाल्ला
याने चिठ्या-पत्रे खाल्ली
पुस्तक खाल्लं
रेडिओ खाल्ला
टेप रेकॉर्डर खाल्ला
कँमेरा खाल्ला
केल्क्युलेटर खाल्लं
याने मैत्री खाल्ली
भेटीगाठी खाल्ल्या
आपलं सुख समाधान खाल्लं
आपला वेळ खाल्ला
पैसे खाल्ले
नाती खाल्ली
आठवण खाल्ली
याने आरोग्य खाल्लं
व एवढं सर्व खाऊन तो स्मार्ट बनलेला आहे.
बदलणाऱ्या जगावर असा परिणाम होऊ लागला...
माणूस वेडा आणि फोन स्मार्ट होऊ लागला...
जोपर्यंत फोन वायरने बांधला होता.
माणूस स्वतंत्र होता.
आता माणूस फोनला बांधला गेला...
बोटंच निभावतात आता नाती
भेटायला-बोलायला वेळ कोणाला आहे.
सर्व टच करण्यात बिझी आहे.
परंतु टच मध्ये कोणीच नाही.....!
- सोशल मीडिया