Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ओटीत घातली मुलगी विहिणबाई........

ग.दि.माडगूळकर मराठी कविता
ओटीत घातली मुलगी विहिणबाई........
 
ओटीत घातली मुलगी विहिणबाई
सांभाळ करावा हीच विनवणी पायी
 
वधुमाय तुम्ही ही तुम्हां सारे ठावे
वाटते तरीही आर्जवुनी सांगावे
मी पदर पसरते जन्मदायिनी आई
 
माहेर आपुले सत्पुरुषांच्या वंशी
सासरी वाढत्या सतत सुखांच्या राशी
पाठिशी आपुल्या नित्य उभी पुण्याई
 
लाडकी लेक ही माझी पहिली-वहिली
भाग्येच तियेच्या सून आपुली झाली
तुम्हीच यापुढे तिजसी माझ्या ठायी
 
 
- ग.दि.माडगूळकर

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महिन्यातून दोनदा मासिक पाळी येणे सामान्य आहे का? कारण जाणून घ्या