Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काही मंडळींना ना कुणावर विश्वासच नसतो

, मंगळवार, 12 सप्टेंबर 2023 (10:42 IST)
काही मंडळींना ना कुणावर विश्वासच नसतो,
कित्ती ही काम असलं तरीही तो स्वतः च करत बसतो,
आपल्या पेक्षा कुणी चांगलं करूच शकत नाही, अस  त्यांना वाटतं !
त्यांच्या नजरेत कुणीच चांगलं करू शकत नसत,
या उलट काही लोकं, उंटावरून शेळ्या हाकतात,
परस्पर काम दुसऱ्या वर सोपवून मोकळे होतात,
चुकलं माकल कुणाचं तर त्यांना रागावतात,
पण पुन्हा त्यांच्याच करवे काम ते करतात,
आपल्याच इशाऱ्यावर इतरांना नाचवून घेणारे पण खूप असतात,
हुकमाच्या फैऱ्या सोडत, आपण जागेवरच बसतात.
काम केल्याचा आव तर इतका आणतात,
सर्व जगच ह्यांच्या मुळंच चालतं, असच भासवतात!
व्यक्ती तितक्या प्रकृती, हे तर असच चालायचंच,
काम होण्याशी मतलब असतो, आपण फक्त बघायचं.
..अश्विनी थत्ते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

This lipstick is available in five shades लिपस्टिकचे हे पाच शेड आहे चलनात