Article Marathi Poetry %e0%a4%85%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%ae %e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7 109011000021_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अनाम भावबंध

डॉ. सौ. उषा गडकरी

अनाम भावबंध संबंध कोपरा
ND
कधी कधी वाटतं
असं कोणतं नातं तुझ्या-माझ्यात?
ज्यात लौकिक सर्व संबंधाचा
अभाव असूनही
अनाम भावबंधाचा अतूट बंध
मनाचा कोपरान् कोपरा
गंधित करतोय
लक्षात आलं
शुद्ध, सात्त्विक निर्मलतेचा झरा
जो तुझ्याकडून
माझ्यापर्यंत झुळझुळतोय्
त्यातूनच मन
सदाफुलीचं बन बनत जातंय्.

Share this Story:

Follow Webdunia marathi