अपेक्षा
स्व. सौ. मीना दिनकर आठल्ये
अपेक्षा अपेक्षा अपेक्षाअपेक्षांचे एक मोठे जाळे घेऊनवावरत असतो भोळा माणूसउद्याच्या उगवत्या सूर्याची सोनेरी किरणेनिश्चितच करतील सुंदर फुलांची उधळणटपोरी टपोरी सुंगधी फुलंअपेक्षांची मोहक रंगीबेरंगी फुलंसमीराच्या झोक्यावर डोलणारी फुलंवेलीवर वृक्षावर फुललेली फुलंसडाच सडा शिंपलेला फुलांचावाकून उंचावून तोडूया म्हटलंतर कधी उंचावलेली टाच पडते कमीतर कधी गोळा केलेली सड्यातली फुलंकुणितरी येऊन परडीतून हिसकावून घेतंआणि होते केवळ उपेक्षा
सार्या अपेक्षांची उपेक्षा
आणि होतात सार्या अपेक्षा भंग
अपेक्षाभंगाचे दु:ख नाही पेलवत
ह्या भोळ्या भाबड्या माणसाला
तेव्हा नको तो अपेक्षाभंग नको त्या अपेक्षा