Article Marathi Poetry %e0%a4%89%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a4%a1%e0%a4%be 107050400017_1.htm

rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उकीरडा

मराठी कवयित्रि माधुरी अशिरगडे यांची कविता
उकीरडा झालाय पार आयुष्याचा

त्यावर डुकरासारखे लोळणारे तुम्ही

वेळप्रसंगी कुणाचीही निष्ठा खाण्यास

तयार असलेले लुब्रे तुम्ही

उकीरडा उखडलेला खपणार नाही तुम्हाला

स्वत: सतरा गड्डे कराल

तेथे ओंगळवाणी पोरं जनवाल

रंध्रच बंद झालीय

तुमच्या हृदयाची

स्वार्थी इंद्रियेत फक्त ठळक

दिसतील तुमची

बाकी सारीच ‍थिजलेली

गिळगिळीत थंड्या प्रेती

स्पर्शासारखी

तुमच्या कवेतील अहेव उब

जगवत बसा असेच

सांख्यिक उकीरडे असंख्य

आणि अनेक उकीरडे

तयार करा अविरत



Share this Story:

Follow Webdunia marathi