Article Marathi Poetry %e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%af%e0%a4%be 109011000001_1.htm

rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

किमया

डॉ. सौ. उषा गडकरी

किमया
ND
सुखाच्या डोही
मन डुंबत राही
सुखाचेच माणिक मोती
दोन्ही हातांनी सावडी

सुखाचीच भेट-गाठ
घरी-दारी सर्वदूर
सुखाशीच जणू
जन्मजन्मांची साथ

सुखानेच केली
आता अशी किमया
दु:खसुद्धा आले दारी
सुखवेश लेवूनिया.

Share this Story:

Follow Webdunia marathi