Article Marathi Poetry %e0%a4%9a%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0 107052700002_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चक्र

सुभाषिणी यांची कविता
वठलेल्या झाड्यावर चढली
वेळ जांभळी फुलारलेली
तिला न ठाऊक झाड कसें ते
चढत रहाणे माहीत होते।।

जगण्याचे ओझे घेऊन पाठी
झाड बिचारे उभेच होते
अजून उन्मलून नाही पडले
म्हणून कां ते उभेच होते ।।

पोटी धरुनी घट्ट मुले
जमीन माऊली या बाळाला
वठतंय तरी सांभाळत होती
आणि जोपासत होती वेल फुले।।

एक निघाला दुजा जन्म हो
चक्र चालले पुढे पुढे
प्रवाह जीवन गतिमान हा
कां? कशाला? नको तिढे.

Share this Story:

Follow Webdunia marathi