Article Marathi Poetry %e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%a3%e0%a5%80 109110500033_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चाळणी

- उषा गडकरी

चाळणी कथा साहित्य कविता
ND
जे जे समोर आलं
ते ते स्वीकारीत जाण्याच्या प्रवृत्तीमुळं
मनाचं दालन गच्च भरून गेलं
वेगवेगळ्या असंबधित
आणि संदर्भहीन गोष्टींनी.

वाटलं होतं, खूपच कोलाहल आणि गोंधळ होईल
परंतु मनानंच तयार केलेल्या
जाळीदार चाळणीतून
नेमक्या मूल्यवान गोष्टीच
गाळल्या गेल्या खाली

आता मनाचं तळघर
सुरक्षित आहे
निवांत आहे
समृद्ध आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi