इकडून-तिकडून माणूस
घेऊन येतो संदर्भ
आई-वडिलांचे, शेजार्यांचे
शिक्षणाचे आणि व्यवसायाचे
त्या संदर्भातूनच
एका आशयघन, अर्थगर्भ
आयुष्याचा आलेख
रेखला जातो
मनाच्या पाटीवर साकार होतात
एका गूढ पण ओढ लावणार्या
कथेचे आराखडे
जीवनपटावरील ओरखड्यांचेही
हिशोब लावले जातात काटेकोरपणे
कुणीतरी गौरवितं, गुणी दूषणं देतं
राग-विरागाचं बीज पेरलं जातं
नकळतच जीवनाला वेग येतो
एका असोशीनं जीवन भोगलं जातं
जीवन तेच,
पण एका तिर्हाइताच्या दृष्टीनं
त्याला न संदर्भ, ना अर्थ
ना आशय, ना मूल्य
मीच माझ्या घरात जेव्हा
असा होतो बाहेरचा
तेव्हा पाटीच्या कोर्या गंधानं
होतो वेडापिसा.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा