Article Marathi Poetry %e0%a4%a8%e0%a4%9c%e0%a4%b0 109061700050_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नजर

डॉ. सौ. उषा गडकरी

नजर कथा साहित्य कविता साहित्यकार लेखक
ND
लोखंडी साखळदंडानं
गच्च लावलेला दरवाजा
अलगद उघडावा
आणि आतल्या वाटेवरून सहज सरसरत चालत राहावं
कुठलेही काटेकुटे, खाचखळगे आडवे येऊ नयेत
विंचवांना वा सापानं वाट रोखू नये
साक्षात प्रकाशानंच बोट धरून
हळूवार पुढं पुढं न्यावं
तशी तुझी एकच आश्वासक नजर
एखादाचा बोललेला शब्द
उभ्या आयुष्याचा
तोल सांभाळतो आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi