Article Marathi Poetry %e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%80 %e0%a4%ad%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be 110020100003_1.htm

rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाणी भरताना

श्री दादासाहेब तांदळे

पाणी भरताना
गावच्या पाणवठ्यावर
बाईच्या एका,
घागरीला एकदा
पाणी भरताना,
घागरीचा माझ्या
धक्का लागला, !

डोळं मोठं करुन
रागानं बघत
'किरडी वाल्याचं
दांडकं निखाळलं'
असं म्हणत,
पाणी तिनं वतलं,
हात पाय धुतलं,
घागर तिनं घासली,
लांब जावून भरली,
आणि लागली
घराच्या वाटेला !

Share this Story:

Follow Webdunia marathi