Publish Date: Wed, 02 May 2012 (17:37 IST)Updated Date: Wed, 02 May 2012 (17:36 IST)
WD
मी चोखाळलेला मार्ग माझ्या पायांनी जखमी झाला तुझा प्रत्येक प्रसव माझ्या अस्तित्वानं वांझोटा झाला माझ्या व्यक्तित्वाच्या सभोवतीच का असावं हे नतद्रष्ट वलय का सांगाळता येऊ नये मला सामान्यत्वाची सहज लय प्रत्येक अमृतमयता पियुष का न व्हावी माझ्या हस्तक्षेपाने पुन्हा पुन्हा तो नश्वर स्वाभिमान मग खोटा झाला पळापळाने मी जेव्हा जेव्हा दु:खाचा महाप्रलयच पाहिला सुखाचा साक्षात्कार फक्त त्या 'नोहा' लाच झाला माझी मानसिकता हतबल होणारी कदापि नाही माझ्याच आकांक्षांनी का असावं सदा विदेही मला ओळखायचं होतं त्या मूलभूत स्वत्वाला नव्या आत्मभानाचं राऊळ आणायचं होतं आकाराला...