Article Marathi Poetry %e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9d%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%b2%e0%a4%be %e0%a4%ae%e0%a5%80 108010500007_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

माझ्यातला मी

- भावना दामले

माझ्यातला मी
NDND
आपण आपले आपल्यालाच शोधत असतो.
प्रत्येक क्रियेतून, प्रत्येक प्रतिक्रियेतून
स्वत:ला शोधताना ठेचाळत जातो
जखमी होत जातो
तरीपण शोधत जातो
पूर्ण जीवनच एक शोध असतो
स्वत:ला ओळखायला
आपण मनाचा कानाकोपर्‍याचा शोध घेत असतो
आपण शोधत असतो
माझातला मी
कधी भेटतो कधी भेटत नाही
आणि भेटला तरी ओळख होत नाही
कधी आपणच भेटायचे टाळतो
नवीन - नवीन क्लृप्ती शोधून
हूलकावणी देत असतो
कारण माझ्यातला मी
नेहमी स्पष्ट व सत्यच सांगतो
आणि ते अप्रिय सत्य आवडत नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi