Article Marathi Poetry %e0%a4%ae%e0%a5%88%e0%a4%ab%e0%a4%b2 108090400020_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मैफल

डॉ. उषा गडकरी

मैफल
श्वास उच्छवासाच्या लयीवर
दरेक क्षणी गडत मोडत जाणार्‍या
घटनांच्या अखंड आवर्तनातून
ऐकू येत आहे एकच धून...

स्वर तिचे कधी आर्त, कधी कर्कश
कधी मधुर तर कधी करूण
दारूण जीवनानुभवाची
खडतर पायवाट तुडवून
पोहोचायचे आहे त्या मैफलीत....

पोहोचायचे आहे त्या मैफलीत
जी माखलेली आहे
एका शांत रसाने
आणि रंगलेली आहे.
एका अनोख्या प्रसन्नतेने....

Share this Story:

Follow Webdunia marathi