Article Marathi Poetry %e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%80 109050400013_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिदोरी

डॉ. सौ. उषा गडकरी

शिदोरी
ND
निरर्थकतेला अर्थ देता देता
थकून गेलेलं मन
जागं झालं खडबडून
गोंळळून, वेध घेत राहिलं
असंबद्ध, अतार्किक
घटनाक्रमामधील सुसंगती शोध

अचानक अचानक लक्षात आलं
अर्थ शोधण्याची ही दुर्दम्य आकांक्षा
आधार होते जगण्यासाठी
आणि मग
निरर्थकताच सार्थक जीवनाची शिदोरी बनून
जीवनाची वाट सुलभ करून देते.

Share this Story:

Follow Webdunia marathi