Article Marathi Poetry %e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%9c 107050400016_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

समज

मराठी कवयित्रि माधुरी अशिरगडे
अशी उन्मळून येऊ नकोस

तुला सावरायला इथं

कुणाचेच हात रिकामे नाहीत

स्वार्थाच्या तद्दन भाडोत्री बाजारात

निरपेक्षपण धजन नाही

स्वस्त करून नकोस

डोळ्यांचं डबडबलेपण

चिंध्यांनाही फुकट कुणी

दवडवत नाही

दु:खाचे कढ ऊतू देऊ

नकोस

सौख्याचे नि:श्वास त्यानं

विझत नाहीत

उदासपण माखलेले

श्वास आता आवर

तुझ्या अस्तित्वाचं

विझलेपण कुणी

देखणार नाही इथं

आत्मभानाच्या प्रसव कळा

अनावर होत असतील तर

स्वत्व न पसरवता

वांझपण कां

मिरवित नाहीस ?



Share this Story:

Follow Webdunia marathi