Article Marathi Poetry %e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%b0 %e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%a4 108092600015_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सूर- संगीत

सौ. स्वाती दांडेकर

सूर संगीत
सूर जुळता सुरात तुझ्या
जीवन बनले संगीत माझे
ND
सात सुरात रंगले मन माझे
तुझ्यात जणू समरस झाले
प्रीत सागरी डुबुन गेले
मन मंदिर हे पावन झाले
समाधानाची सदा भरती राहावी
दु:खाची सदा ओहटी रे
सागरपरी विशालता राहावी
माझ्या मनी सदा रे
न देवो देव कधी किनारा
तुझ्या अन माझ्या प्रीतिला रे
अखंड माझी जीवन धारा
येवुनी मिळावी तुझ्या सुख सागरी रे

Share this Story:

Follow Webdunia marathi