हृदयात पेटले किती किती वेदनांचे निखारे
नयनात आसवे किती पण पापण्यांचे पहारे
दिसतो खडा पहारा कित्येक दानवांचा
येऊ कशी किनारी सेतू नसे कशाचा
सांगु कशी कुणा मी हे दु:ख अंतरीचे
शब्दास रोखिती पण हे अधर अमृताचे
गरुडाची झेप घेते पक्षीण भावनांची
पण कातरीत पंख ही गस्त मन-मनाची.