Article Marathi Poetry %e0%a4%b9%e0%a5%87 %e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9d%e0%a5%87 %e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%a8 108013100002_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हे माझे जीवन

- मनोहर धडफळे

हे माझे जीवन
NDND
जसे फुलांनी बहरून यावे
उधळित गंधा मुक्त हसावे
जनमनास प्रमुदित करण्या
हे माझे जीवन जावे।

जळुनि स्वत: इतरां सुखवावे
भस्म होऊनि स्मृति उरावे
कशकाय त्या उदबत्तीसम
सुगन्ध पसरित मिटून जावे

म्लान मुखाचे अश्रु पुसावे
निराश्रितांसि जवळ करावे
कष्‍ट जनांचे हरता हरता
या देहाचे खोड झिजावे

बन्ध रेशमी 'असहय' होईतो
उत्कट क्षण ते सार्थ करावे
आठव अपुला राहील जगा या
अशा समयी हे आयुष्य सरावे।

Share this Story:

Follow Webdunia marathi