Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ज्येष्ठ समीक्षक प्रा. रा. ग. जाधव यांचे निधन

ज्येष्ठ समीक्षक प्रा. रा. ग. जाधव यांचे निधन
, शुक्रवार, 27 मे 2016 (11:47 IST)
ज्येष्ठ समीक्षक प्रा. रा. ग. जाधव यांचे आज सकाळी 6 वाजता पुण्यात निधन झाले. दुपारी 12:30च्या दरम्यान वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होतील.
 
प्रा. रा.ग. जाधव ( जन्म ऑगस्ट २४, १९३२ ) मराठीतील प्रख्यात समीक्षक. मराठी विश्वकोषात महत्वपूर्ण योगदान. 
 
औरंगाबाद येथील २००४
सालातल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
 
कारकीर्द :
 
स्टेट ट्रान्स्पोर्ट-महाराष्ट्र राज्य परिवहन-एस.टीमध्ये १० वर्षे, प्राध्यापकी १० वर्षे, मराठी विश्वकोशामध्ये मानव्य विद्याविषयक लेखनाचे प्रमुख संपादक - २० वर्षे अशी रा.ग.जाधव यांची कारकीर्द आहे..
 
लेखन प्रकार
 
समीक्षा, कविता लेखन, ललित लेखन
 
रा.ग. जाधव यांचे प्रकाशित साहित्य
 
आनंदाचा डोह 
 
काव्य समीक्षेतील धुळाक्षरे
 
खेळीमेळी (ललित) (प्रकाशन वर्ष २००८)
 
नववाङ्‌मयीन प्रवृती व प्रमेये
 
निवडक समीक्षा
निळी पहाट, निळी क्षितिजे, निळे पाणी
 
पंचवटी
 
प्र. के. अत्रे : साहित्यदृष्टी व साहित्यविचार
 
माझे चिंतन
 
वागर्थ
वाममयीन निबंध लेखन
 
वाममयीन परिप्रेक्ष्य
 
वासंतिक पर्व (ललित) (प्रकाशन वर्ष २००९)
 
विचारशिल्प
 
संध्यासमयीच्या गुजगोष्टी (निवडक लेखांचे पुस्तक) (साधना प्रकाशन) (प्रकाशन वर्ष २०१३)
 
समीक्षेतील अवतरणे
 
साठोत्तरी मराठी कविता व कवी
 
साहित्य व सामाजिक संदर्भ
 
साहित्याचे परिस्थितीविज्ञान
 
संपादन
 
आधुनिक मराठी कवयित्रींची कविता (१९८० ते १९९५ कालातील मराठी कवयित्रींची कविता)निवडक साने गुरुजी

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

डिझायनर पेन स्टँड