Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Annabhau Sathe Biography in Marathi – अण्णा भाऊ साठे यांची थोडक्यात माहिती

annabhau sathe
, सोमवार, 18 जुलै 2022 (16:16 IST)
साठे यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी अस्पृश्य मातंग जातीच्या कुटुंबात, आजच्या महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याचा एक भाग असलेल्या वाटेगाव या गावी झाला.
 
या जातीचे लोक त्यावेळी तमाशाच्या कार्यक्रमात पारंपारिक पद्धतीचे लोक वाद्य वाजवत असत. त्यांच्या वडीलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई साठे होते.
 
त्यांनी दोन लग्न केलीत, त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई साठे तर दुसरी जयवंता साठे ह्या होत. त्यांना एकूण तीन मुले होती – त्यांची नावे मधुकर, शांता आणि शकुंतला.
 
अण्णा भाऊ साठे यांनी वर्ग चारच्या पलीकडे शिक्षण घेतले नाही. कारण तेथील लोकांकडून होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली.
 
ग्रामीण भागातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर १९३१ मध्ये ते सहा महिन्यांच्या कालावधीत सातारा येथून मुंबईत स्थलांतरित झाले.
 
लेखन – Writings
हजारो साहित्यिक आपणास सापडतील, परंतु भयानक प्रतिकूल परिस्थितीतही पुढे जाणारे मोजकेच मिळतील. अशिक्षित असूनही, त्यांना केवळ वाचन-लेखन करण्याची क्षमताच मिळाली नाही तर क्रांतीचे एक उत्तम साहित्य निर्माते झाले.
 
त्यांनी मराठी भाषेत ३५ कादंबऱ्या लिहिल्या. ३ नाटके, १० पोवाडे, १४ तमाशे लिहिले. त्यांच्या ८ कादंबऱ्या वर सिनेमे देखील बनवले आहेत.
 
साठे यांच्या पोवाडा आणि लावणी यांसारख्या लोककथात्मक कथा शैलींच्या वापराने लोकांमध्ये ते लोकप्रिय बनले.
 
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि लावणी “माझी मैना” लिहिली.
 
त्यांना फकीरा या कादंबरी साठी राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. या कादंबरी मध्ये फकिरा नावाचा धडकी भरवणारा तरुण माणूस, त्याचे पराक्रम, ब्रिटिश राजवटीतील (भारत) आपल्या समाजातील लोकांच्या हक्कांसाठी आणि खेड्यातल्या वाईट वागणुकी त्यांची वैर.
 
अण्णा भाऊ साठे साहित्य संग्रह – Annabhau Sathe Collection of Literature
कथासंग्रह – Storytelling
निखारा, नवती, फरारी, पिसाळलेला माणूस, जिवंत काडतूस, आबी, खुळंवाडा, गजाआड, बरबाद्या कंजारी (१९६०), चिरानगरची भुतं (१९७८), कृष्णाकाठच्या कथा,
 
कादंबऱ्या – Novels
चित्रा (१९४५), फकिरा (१९५९), वारणेचा वाघ (१९६८), चिखलातील कमळ, रानगंगा, माकडीचा माळ (१९६३), वैजयंता, रत्ना, रूपा, गुलाम, चंदन, मथुरा, आवडी, वैर, पाझर.
 
लोकनाट्य – Folk drama
अकलेची गोष्ट (१९४५), देशभक्त घोटाळे (१९४६), शेटजींचे इलेक्शन (१९४६), बेकायदेशीर (१९४७), पुढारी मिळाला (१९५२), लोकमंत्र्यांचा दौरा (१९५२), माझी मुंबई, कापऱ्या चोर, मूक मिरवणूक.
 
नाटके
इनामदार (१९५८), पेंग्याचं लगीन, सुलतान
 
अण्णा भाऊ साठे यांचे निधन – Annabhau Sathe Death
१८ जुलै १९६९ रोजी त्यांचे निधन झाले,असे म्हणतात की ते बर्‍याच दिवसांपासून भुकेने आणि उपासमारीमुळे त्याचा मृत्यू झाला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

PGCIL मध्ये नोकरीची संधी