Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रसिद्ध नाटककार, साहित्यिक किरण नगरकर यांचे मुंबईत निधन

प्रसिद्ध नाटककार, साहित्यिक किरण नगरकर यांचे मुंबईत निधन
मुंबई , शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019 (11:44 IST)
साहित्यप्रेमींच्या मनावर अधिराज्य निर्माण करणारे प्रसिद्ध साहित्यिक, कादंबरीकार, पटकथा लेखक, नाटककार आणि अस्तित्ववादी साहित्याचे बिनीचे शिलेदार किरण नगरकर यांचं गुरुवारी प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ७७ वर्षाचे होते. त्यांच्या जाण्याने मराठी, हिंदी आणि इंग्रजी साहित्यक्षेत्राची मोठी हानी झाली आहे. 
 
किरण नगरकर गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्याने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असतानाच आज रात्री ८.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नगरकर यांनी त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून भाषेच्या सीमा ओलांडल्या होत्या. त्यांनी मराठीबरोबरच इंग्रजीतही लिखाण केलं होतं. मराठी साहित्य विश्वात त्यांची सात सक्कं त्रेचाळीस आणि ककल्ड ही कादंबरी प्रचंड गाजली. या दोन्ही कादंबऱ्या मराठी साहित्यविश्वातील क्लासिक कादंबरी म्हणून गणल्या जातात. त्यांना हिंदू लिटररी प्राइज, जर्मनीचा ऑर्डर ऑफ मेरिट आणि साहित्य अकादमीच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आलं होतं. 
 
नगरकरांच्या कादंबऱ्या
 
सात सक्कं त्रेचाळीस 
रावण अँड इडी 
ककल्ड 
गॉड्स लिट्ल सोल्जर 
रेस्ट अँड पीस 
जसोदा: अ नॉवेल 
 
नाटक
बेडटाइम स्टोरी 
कबीराचे काय करायचे 
स्ट्रेंजर अमंग अस 
द ब्रोकन सर्कल 
द विडो ऑफ हर फ्रेंड्स 
द एलिफंट ऑन द माऊस 
ब्लॅक टुलिप 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्र पोलीस दलात मोठी भरती, जाहिरात प्रसिद्ध