गजानन दिगंबर माडगूळकर म्हणजेच आपले सर्वांचे ओळखीचे गदिमा, यांचा जन्म शेटफळे सांगली महाराष्ट्र जिल्ह्यात 1 ऑक्टोबर 1999 रोजी झाला. यांच्या वडिलांचे नाव दिगंबर बळवंत माडगूळकर आणि आईचे नाव बनुताई दिगंबर माडगूळकर होते. ह्यांचे शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध येथे झाले. ह्यांचा घराची परिस्थिती बेताची होती. गणित विषयामुळे मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण करता आली नाही.
घराची परिथितीमुळे पुढचे शिक्षण घेता आले नाही. त्यामुळे चरितार्थासाठी चित्रपट व्यवसायात यावे लागले. यांचा नक्कल करण्याच्या आणि लिखाण्याचा आवडीमुळे त्या कलेचा येथे चांगलाच उपयोग झाला.
हंस पिक्चर्स चित्र संस्थेच्या ब्रह्मचारी (1938) यांनी छोटी भूमिका साकारून आपल्या चित्रपटातील कारकीर्दीचा शुभारंभ केला. लेखनिक म्हणून ही त्यांनी कार्य केले. सुप्रसिद्ध साहित्यकार वि.स. खांडेकरांचे ते लेखनिक होते. त्यांचाच पुस्तक संग्रहालयात त्यांना अनेक पुस्तके वाचायला मिळाली. त्यामुळे लिखाणाला वेग आला. नवयुग चित्रसंस्थेत के. नारायण काळे यांचा हाताखाली सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. आचार्य अत्रे यांचा प्रासादिक गीत रचनेचा आदर्श ह्यांचा सामोरी होता. गदिमांनी भक्त दामाजी आणि पहिला पाळणा ह्या चित्रपटाची गीते लिहिली. त्यांना लोकशाहीर रामजोशी चित्रपटात कथा संवाद आणि गीते लिहिण्याची तसेच एक छोटी भूमिका करण्याची संधी मिळाल्याने त्यांनी चित्रपटातील सृष्टीत आपला ठसा उमटवला आणि मराठी सृष्टीचा भक्कम आधार बनले.
ते कवी आणि लेखकाच्या नात्याने यांचा कवितेवर ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम सारख्या संतांचे सखोल संस्कार झाले होते. ह्यांचा कवितेवर मराठमोळे पण्याचे संस्कार दिसतात.
गदिमा आधुनिक काळातील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक होते. अनेक समरगीते, बालगीते यांनी लिहिली आहे. यांनी लिहिलेले गीत रामायणाने तर मराठमोळ्या प्रेक्षकांना अक्षरश: वेडच लावले आहे. यांच्या गीत रामायणाने सर्वत्र कीर्ती पसरविली आहे. हे भाव कवी सुद्धा आहे. त्यांचा काव्यावर संत काव्य आणि शाहिरी दोन्ही काव्याचा प्रभाव दिसून येतो. ह्यांनी अनेक लावण्या आणि चित्रपट गीते लिहिले आहे जे आजही प्रसिद्ध आहे. ह्यांचा गीतरामायणाच्या गायनाचे शेकडो कार्यक्रम झाले व अजून ही होत आहे. अनेक भारतीय भाषे मध्ये त्याचे अनुवाद केले गेले आहे.
त्यांची काही गाजलेली चित्रपट पुढचं पाऊल, बाळा जो जो रे, लाखाची गोष्ट, जगाच्या पाठीवर, संथ वाहते कृष्णामाई, मराठी चित्रपट तसेच तुफान और दिया, दो आँखे बारह हाथ, गुंज उठी शहनाई, असे हिंदी चित्रपटातही लिखाण कार्य केले आहे.
त्यांना अनेक पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले आहे.
भारत सरकाराने पद्मश्री देऊन त्यांचा सन्मान केला. 1973 साली त्यांना मराठी साहित्य संमेलन यवतमाळचे अध्यक्षपद देण्यात आले. महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाचे सदस्य संगीत नाटक अकादमी व विष्णुदास भावे सुवर्णपदक पुरस्काराने सन्मानित झाले.
14 डिसेंबर 1977 रोजी पुणे येथे ह्यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेला जन सैलाब लोटला होता. स्त्री, पुरुष, वृद्ध, राजकारणी, कलावंत, लहान मुले असे सर्व त्यात सामील झाले होते. त्या दिवशी एकही घरात चूल पेटल्या नाही. सगळ्यांना त्यांनी आपलेसे केले असल्याने ते सगळ्यांना घरातीलच वाटत होते. अवघ्या वयाच्या 58 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
तरीही आजही ते त्यांचा असंख्य गाण्यातून, साहित्यातून, चित्रपटातून, गीत रामायणातून मराठमोळ्या रसिकांच्या हृदयात विद्यमान आहेत. "मराठी माणसात ज्या स्थळी पवित्र आणि सुंदर गोष्टींचा वास आहे. अश्या सुंदर मनात गदिमांचे स्थान आहे."