Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पु ल देशपांडे यांचे सुविचार

पु ल देशपांडे यांचे सुविचार
, सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (09:44 IST)
माणसाचे केस गेलेले असले तरी चालतील 
पण माणूस हा गेलेली केस नसावा.
 
चोरीमध्ये वाईट काहीच नसतं, 
तुम्ही काय चोरता ह्याच्यावर ते अवलंबून आहे, 
तुम्ही जर एखाद्याच मन चोरल तर त्यात वाईट काय आहे.
 
मोठेपणी श्रीमंत हॉटेलात पार्ट्या देणाऱ्या मित्रांपेक्षा 
लहानपणी न मागता हातावर खोबऱ्याची वडी देणारी म्हातारी आठवते.
 
क्रियापदाच मोठेपण त्याच्या कर्त्याने केलेलं कर्म किती मोठ आहे ह्याच्यावर अवलंबून असते.
 
खरं तर सगळे कागद सारखेच 
फक्त त्याला अहंकार चिटकला 
की त्याच सर्टिफिकेट होत.
 
भरलेला खिसा माणसाला “जग” दाखवतो आणि रिकामा खिसा जगातील “माणस” दाखवतो, 
ज्याला शंभर किलो धान्याचं पोत उचलता येतं, त्याला ते विकत घेता येत नाही 
आणि ज्याला विकत घेता येतं, त्याला उचलता येत नाही, 
“विचित्र” आहे पण सत्य आहे.”
 
समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, 
कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो 
तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
 
काही माणसे जन्मता असे काही तेज घेऊन येतात, 
की त्यांच्यापुढे  मी मी म्हणणारे उगीचच हतबल होतात.
 
जगा इतके की आयुष्य कमी पडेल 
हसा इतके की आनंद कमी पडेल, 
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे 
पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच आहे.
 
शेवटी काय हो,
आपण पत्त्याच्या नावाचे धनी,
मजकुराचा मालक निराळाच.
 
परिस्थिति हा
अश्रूंचा कारखाना आहे!.
 
प्रयास हा
प्रतिभेचा प्राणवायू आहे
 
जगात काय बोलत आहात
ह्यापेक्षा कोण बोलत आहात
ह्याला जास्त महत्त्व आहे.
 
जाळायला काही नसलं की
पेटलेली काडीसुध्दा आपोआप विझते.
 
माणसाला माणूस
जोडत गेलं पाहिजे…
 
आयुष्य फार सुंदर आहे…
ते फक्त चांगल्या विचारांनी
जगता आलं पाहिजे…
 
खर्च झाल्याचं दु:ख नसतं,
हिशोब लागला नाही की त्रास होतो.
 
माणूस अपयशाला भीत नाही.
अपयशाचं खापर फोडायला
काहीच मिळालं नाही तर?
याची त्याला भिती वाटते.
 
आपलाही कोणाला
कंटाळा येऊ शकतो ही
जाणीव फार भयप्रद आहे.
 
खरं तर सगळे कागद सारखेच…
त्याला अहंकार चिकटला की
त्याचे सर्टिफिकेट होते.
 
बोलायला कुणीच नसणं
यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोचणं
ही शोकांतिका जास्त भयाण.
 
सगळे वार परतवता येतील पण
अहंकारावर झालेला वार
परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही
 
कोणत्याही सुखाच्या क्षणी
आपण होशमध्ये असणं
यातच त्या क्षणाची अपूर्वाई आहे.
 
रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो.
पण तुळस वृंदावनातच राहते.
तिच्यापुढे आपल्यालाच उभं राहावं लागतं.
 
आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की
समजावं आपला उत्कर्ष होतोय.
ज्यांच्या असण्याला अर्थ असतो,
त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते.
 
शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो.
बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो.
 
रातकिडा कर्कश ओरडतो
यात वादच नाही. त्याचा त्रास होतो.
पण त्याहीपेक्षा जास्त त्रास तो
कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही, याचा होतो.
 
कोणत्याही सुखाच्या क्षणी
आपण होशमध्ये असणं
यातच त्या क्षणाची अपूर्वाई आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Low blood pressure लक्षणे, कारणे आणि त्यावर घरगुती उपचार