Article Marathi Poets %e0%a4%8f%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a5%89%e0%a4%b0 %e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a4%be %e0%a4%ac%e0%a5%81%e0%a4%95%e0%a4%b0 %e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0 113101700007_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एलिनॉर यांना बुकर पुरस्कार

एलिनॉर यांना बुकर पुरस्कार
WD
न्यूझीलंडमधील लेखिका एलिनॉर कॅटॉन यांची ‘द लु‍मिनरीज’ या तिच्या कादंबरीसाठी यंदाच्या मॅन बुकर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. 28 वर्षीय एलिनॉर या 45 वर्षाच्या बुकर पुरस्कारांच्या इतिहासात सर्वात कमी वयात हा पुरस्कार मिळविणार्‍या लेखिका ठरल्या आहेत.

ज्युरी प्रमुख असलेले रॉबर्ट मॅकफार्लेन यांनी एलिनॉर यांच्या 848 पानांच्या कादंबरीची खूप स्तुती केली आहे. ते म्हणाले की, ‘द लुमिनरीज’ ही सर्वोत्कृष्ट कादंबरी आहे. याची रचना अद्भुत आहे. या कादंबरीची कथा आपल्याला खिळवून ठेवते. सोने आणि लालसा याचे सर्वोत्तम वर्णन या कादंबरीमध्ये केले आहे.

पन्नास हजार पौंडचा हा पुरस्कार जिंकल्यानंतर एलिनॉर यांनी प्रकाशकांचे आभार मानले आहेत. त्यांनी मला लिखाणाचे स्वातंत्र दिल्यानेच, मी एवढे चांगले लिखाण करू शकले, असे त्यांनी म्हटले आहे.

या पुरस्काराच्या अंतिम शर्यतीत भारतीय वंशाची अमेरिकन लेखिका झुंपा लाहिरी यांच्या ‘द लोलॅड’ या पुस्तकाचाही समावेश होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi