ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक डॉ. अरुण टिकेकर (वय ७१) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
लेखन, वाचन, संशोधन आणि साहित्याचा व्यासंग असलेल्या टिकेकरांनी विविध वृत्तपत्रात संपादकपद भूषविले. त्यांनी मुंबई विद्यापीठाचा रंजक इतिहास लेखणीबद्ध केला आहे. राजकीय नेत्यांवर चुकीच्या पद्धतीने टीका केल्यास कायदेशीर कारवाईसाठी कायदा तयार करावा, असे मत ते आग्रहपूर्वक मांडत असत.