(महाराष्ट्र राज्य ग्रंथ निवड समितीने शासनमान्य यादीसाठी
निवडलेले पुस्तक सन २०१५ यादी क्रमांक २२८६)
माणूस हा जन्माच्या अगोदरपासून विचार करण्याची प्रक्रिया सुरू असते. गर्भधारणेची सुरूवात देखील मेंदूपासून होते. म्हणजेच मेंदू आला म्हणजे एक विचार आला असे समीकरण असते हे सर्वांना माहित आहे. प्रेरणादायी विचार हे पुस्तक वाचत असताना सर्व प्रथम मी माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये खूप काही बदल करून घेतले आणि हे बदल घडवून आणण्याची ताकद लेखिका सौ. संजीवनी सुनिल पाटील यांनी या पुस्तकातील प्रत्येक विचार हा मानवाच्या मेंदूमध्ये खोलवर रूजणारे असे आहेत.
ज्याचे कर्म चांगले आहे ते कधीही संपत नाहीत, सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणार्या असतात. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्कार्य करणे सोडू नका. कारण त्याचे फळ नक्की मिळते समस्यांना घाबरण्यापेक्षा त्यांचा सामना केला पाहिजे.
अनुभव घ्यायला लाखो पुस्तके लागत नाही पण लाखो पुस्तके लिहिण्यासाठी मात्र विचार करावाच लागतो. आपल्याला पंखासाठी म्हणून कधीच उडावे लागत नाही पण उडण्यासाठी मात्र पंखच लागतात. काम करण्यासाठी नाव लागतेच असे नाही पण नाव करण्यासाठी मात्र कामच करावे लागते. काही तरी मिळविण्यासाठी स्वतःवर थोडी फार बंधणे घालणे आवश्यक असते.
नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात. तो चूकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते, त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो. आणि तो शुर असल्याने त्याला कशाची ही भीती नसते. आयुष्यात संकटे ही यायलाच हवीत. संघर्ष हा घडायलाच हवा. चूका ह्या व्हासलाच हव्यात. तुमची निर्भत्सना करणारा कोणी ना कोणी तरी माणूस हा भेटायलाच हवा. त्याशिवाय प्रगती करण्याची इर्षा निर्माण होत नाही. स्वामी विवेकानंद नेहमी म्हणतात. चूका करायला घाबरू नका, मानवाच्या हातून चूका या होणारचं. दहा चूका झाल्या तरी चालतील परंतु एकच चूक दहा वेळा होता कामा नये. असे झाल्यास मानवाची वाटचाल अधोगतीकडे होत राहते.
लेखिका सौ. संजीवनी पाटील यांच्या प्रेरणादायी विचारांच्या मालिकेतील माझ्या मनात घट्ट करून राहणारे वाक्य मी येथे सर्वांना सांगू इच्छीत आहे. ते म्हणजे, एखाद्या माणसाला तुम्ही एक मासा पकडून दिलात तर त्याच्या एक वेळच्या जेवणाची सोय होईल. पण त्याऐवजी मासा पकडायचा कसा हे शिकवलंत तर ती त्याच्या आयुष्य भराच्या जेवणाची सोय असेल. प्रत्येक व्यक्तीने इतरांना तात्पुरती मदत करण्यापेक्षा केलेली मदत त्या व्यक्तीला दिर्घकाळ उपयोगी पडेल याकडे लक्ष दिले पाहिजे. प्रेरणादायी विचार हे पुस्तक वाचून माझ्या जीवनात आणि विचार करण्याच्या पद्धतीमध्ये अमुलाग्र बदल झाला आहे. प्रत्येकाने हे पुस्तक जरूर वाचावे आणि स्वतःचे जीवन यशस्वी करावे अशी आपेक्षा आहे. लेखिका सौ. संजीवनी सुनिल पाटील आणि कवितासागर प्रकाशनचे प्रकाशक डॉ. सुनिल दादा पाटील यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो.
‘प्रेरणादायी विचार’ या विचार करायला लावणा-या पुस्तकाची तिसरी आवृत्ती नुकतीच प्रसिद्ध झाली; या वरूनच हे पुस्तक वाचकांच्या पसंतीला नक्कीच उतरले असल्याचा आनंद संकलकाला मिळाला आहे. पुस्तक किती लहान आहे यापेक्षा त्यातील विचार माणसाच्या जीवनाला चांगली उभारी देत असेल तर नक्कीच त्याला सुज्ञ वाचकवर्ग उपलब्ध होतो याची प्रचीती तीस-या आवृत्तीच्या निमित्ताने आली आहे. समाजातील सर्व थरातील वाचकांनी आपल्या संग्रही ठेवण्यासारखे हे पुस्तक आहे.
‘प्रेरणादायी विचार’ ह्या पुस्तकातील एक तरी विचार तुमचे आयुष्य घडवेल. सकारात्मक विचारातून पूर्णत्वाकडे नेणारे हे पुस्तक स्वतःसाठी घ्या आणि आपल्या मित्र मैत्रिणींना भेट द्या. वेगवेगळे कार्यक्रम, समारंभ, बक्षिसे, वाढदिवस, भेट वस्तू आणि विशेष दिनानिमित्त कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला "बुके नव्हे बुक द्या". ‘प्रेरणादायी विचार’ या आगळ्या वेगळ्या पुस्तकाच्या तिस-या आवृत्ती प्रकाशनासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा! तसेच प्रकाशक व संकलक यांचे पुनश्चः अभिनंदन!
- मंगेश विठ्ठल
कोळी (ज्येष्ठ समीक्षक)
|
पुस्तकाचे नाव |
प्रेरणादायी विचार |
संकलक |
सौ. संजीवनी सुनील पाटील |
|
आवृत्ती |
तिसरी |
ISBN |
978-81-926535-6-3 |
|
प्रकाशक |
डॉ. सुनील पाटील |
प्रकाशन |
कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर |
|
पृष्ठे |
52 (कव्हर सह) |
आकार |
1/8 |
|
मुल्य |
60/- |
विषय |
प्रेरणादायी विचारांचासंग्रह |
|
वर्गवारी |
शैक्षणिक |
संपर्क |
02322 - 225500, 9975873569, [email protected] |