* स्टायलिश भावासाठी गॉगल, मोबाइल कव्हर, डियोड्रंट, परफ्यूम, आकर्षक घड्याळ, बेल्ट यासारख्या वस्तू घेऊ शकता. ब्रेसलेटसारखी सोने किवा चांदीच्या रंगाची राखीही भावास आवडू शकेल. * सोबर पसंत असणार्या भावासाठी एक्झ्युक्युटिव्ह शर्टही छान. आवडीनुसार चेक्स, प्लेन किवा लायनिंगचा शर्ट घेता येईल. भावाच्या आवडीचाच रंग निवडा. * शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेणारा भाऊ असल्यास त्याच्या उपयोगात येणारी कोणतीही वस्तू आपण निवडू शकता. संदर्भग्रंथ, एखादी चांगली कादंबरी किवा सीडीज. * भावाचे लग्न झालेले असेल तर त्यांच्या घरासाठी एखादी चांगली भेट घेऊ शकता. चांगली पेटिग्ज, क्रॉकरी किवा त्यांच्या आवडीची मिठाई चॉकलेट्स, सुका मेवा इ.* भाऊ छोटा असल्यास खेळ किवा खेळाच्या सीडीज घेतल्या तरी चालतील. त्याच्या पसंतीचे कार्टून, चॉकलेट्स काहीही. बहिणीसाठी ही भेट द्या :
* बहिणीस दागिन्यांची आवड असल्यास अंगठी, गळ्यातील हार, कानातील रिंग घेऊ शकता. आपल्या बजेटनुसार सोने किवा हिर्याचे दागिने देऊ शकता. इमिटेशन ज्वेलरीसुद्धा बाजारात उपलब्ध आहे. मात्र, बहिणीची आवड लक्षात घेऊनच भेट घ्या.
* फॅशनची आवड असणार्या बहिणीसाठी नवीन डिझाईनचे दागिने, कपडे, परफ्यूम, फन्सी टॉप्स किवा मग पारंपारिक दागिने ठेवण्याची पेटी घेऊ शकता.
* बहिण छोटी असल्यास तिच्यासाठी आकर्षक टेडी बिअर, चॉकलेट्स घेऊ शकता. तिला वाचनाची आवड असल्यास चांगली कादंबरी घेऊ शकता.
बहिणीचे लग्न झाले असल्यास तिच्या घराच्या सजावटीसाठी काही वस्तू देऊ शकता. पेटिंग्स, फ्लॉवरपॉट किवा मूर्ती. परफ्यूम किवा ज्वेलरी आयटम.