Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भेटीची कदर करा

भेटीची कदर करा

वेबदुनिया

श्रावणमासातील रक्षाबंधनाचा सण. तमाम बहीण- भाऊ या सणाची आतुरतेने वाट बघत असते. बहीण भाऊरायासाठी आवडती राखी शोधत असते आणि भाऊ लाडक्या बहिणीसाठी भेटवस्तू.

NDND
राखी व भेटवस्तूची निवड बहीण किंवा भाऊ लहान आहेत की मोठे. शिक्षण, व्यवसाय, आर्थिक परिस्थिती यानुसार ठरत असते. बहीण लहान असली तर ती दादाकडे भेटवस्तूसाठी हट्ट धरत असते. भाऊ लहान असला ताईला काय भेट द्यायची हे ठरविण्यात त्याची अडचण होते. पप्पा किंवा मम्मी आणून देणार तीच भेट तो ताईस देतो. यावेळेस ताई त्याची चांगलीच फिरकी घेत असते.

वयाने मोठे असलात तर एक प्रकारचे अंडरस्टँडिंग तयार झालेले असते. आवडीनिवडींचाही अंदाज असतो. भाऊ यशस्वी व्यावसायिक किंवा लठ्ठ पगाराच्या नोकरीवर असला तर बहिणीस भेटही तशीच मिळते. एवढे मात्र नक्की की भेटीचे मूल्य किमतीवर ठरत नसून त्यामागच्या भावनेवर ठरते. भेटीच्या माध्यमातून एकमेकांप्रती असलेला आदरभाव, प्रेम, आपुलकी व्यक्त होत असते.

वेळेनुसार संदर्भ बदलतात त्याप्रमाणेच नवनवीन ट्रेंड येत राहतात. सामाजिक प्रतिष्ठेच्या संकल्पना रूढ होत असतात. खोट्या प्रतिष्ठेचे लेबल त्यास चिकटवण्यात येते. भौतिक जीवनशैलीत नात्यांची उदात्त कल्पना, त्यामागची विचारसरणी, धार्मिक, आध्यात्मिक महत्त्व मागे पडून तकलादू गोष्टींना महत्त्व प्राप्त होते. भाव-भावनांपेक्षा भौतिकतेच्या संकल्पनांची मोजपट्टी लावण्याचा प्रयत्न करण्यात येतो. अनुकरणातून अशा गोष्टी प्रस्थापित होत जातात.

webdunia
NDND
भावाने किंवा बहिणीने दिलेली भेट आपल्या अपेक्षेप्रमाणे असो किंवा नसो तिचा उदारपणे स्वीकार करणे यातच मोठेपणा असतो. ती भेट नसून देणार्‍याच्या तुमच्या प्रतीच्या भावना त्याच्याशी निगडित असतात. आपल्या प्रतिष्ठेप्रमाणे ती भेट असो अथवा नसो. आपल्या सोसायटीतले, कुटुंबातील व्यक्ती भेटीबद्दल कोणतेही मत व्यक्त करो, भेटीचा सन्मान ही सर्वोत्तम भेट हे विसरू नये. बहीण- भावाच्या नात्यात अशा गोष्टी सहसा उद्भवू नये. भावाने दिलेल्या भेटीबाबत बहिणीने नाराजी दर्शवली तर तो त्या नात्याचाच अनादर नाही का ठरत?

Share this Story:

Follow Webdunia marathi