Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तिरूचनूरची पद्मावती देवी

तिरूचनूरची पद्मावती देवी
WDWD
तिरूचनूर हे तिरूपती जवळील एक लहानसे गाव आहे. या छोट्याशा गावात देवी पद्मावतीचे सुंदर मंदिर आहे. पद्मावती देवी अतिशय दयाळू आहे. तिला शरण गेल्यास आपली सगळी पापे नष्ट होतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रध्‍दा आहे. तिरूपती बालाजीच्या मंदिरात मागितलेली इच्छा पद्मावती देवीचे आशीर्वाद घेतल्यानंतरच पूर्ण होते अशीही समजूत आहे. तिरूपतीपासून हे मंदिर अवघ्या पाच किलोमीटरवर आहे.

मंदिराचा इतिहा
webdunia
WDWD
तिरूचनूर गावातील हे मंदिर प्राचीन असल्याचे मानले जाते. तिरूपतीतील वेंकटेश्वराचे मूळ मंदिर येथेच होते, असे सांगितले जाते. पण येथील जागा कमी पडू लागल्याने मंदिर तिरूपतीत स्थलांतरीत करण्यात आले. दोन महत्त्वाचे पूजाविधी वगळता बाकीचे रितीरिवाज तिरूपतीमध्येच पार पाडले जाऊ लागले. त्यामुळे तिरूचनूरचे महत्त्व थोडे उणावले.

बाराव्या शतकात यादव राजांनी येथे कृष्ण-बलरामाचे सुंदर मंदिर बांधले. त्यामुळे या मंदिराला महत्त्व प्राप्त झाले. त्यानंतर येथे सोळाव्या आणि सतराव्या शतकात दोन महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. सुंदरा वरदराजाची मूर्ती स्थापन करण्यात आली आणि देवी पद्मावतीसाठी वेगळे मंदिर बांधण्यात आले. पौराणिक कथेनुसार देवी पद्मावतींचा जन्म कमळाच्या फुलात झालेला असल्यामुळे मंदिर तलावात बांधण्यात आले.

webdunia
WDWD
मंदिर परिस
मंदिर परिसरात बर्‍याच देवी-देवतांची लहान-लहान मंदिरे आहेत. देवी पद्मावती व्यतिरिक्त कृष्ण-बलराम, सुंदरराजा स्वामी आणि सूर्यनारायण मंदिरेही आहेत. पण प्रभू व्यंकटेशांची पत्नी असल्यामुळे देवी पद्मावती मंदिराला जास्त महत्त्व पद्मावती देवीची मूर्ती कमळाच्या आसनावर तिच्या वरील दोन्ही हातांमध्ये कमळाचे पुष्प आहे.

कसे पोहोचाल?
मंदिर तिरूपती रेल्वे स्टेशनपासून पाच किलोमीटरवर आहे. रस्त्यालगत असलेल्या या मंदिरापर्यंत
पोहचण्यासाठी तिरूपतीहून बससेवा उपलब्ध आहे. हैदरापासून 547 किलोमीटर अंतरावर आहे.

रेल्वेमार्ग: तिरूपती हैदराबादपासून 547 किलोमीटर अंतरावर असून तेथून रेल्वेसेवादेखील उपलब्ध आहे.

हवाईमार्ग: येथे हैदराबाद, चेन्नई, बंगलोर येथून विमानाने जाता येते.

Share this Story:

Follow Webdunia marathi