Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जागृत देवस्थानः उलटे हनुमान

जागृत देवस्थानः उलटे हनुमान
कवन सों काज कठिन जगमाही
जों नहीं होय, ताँत तुम पाई

WD
धर्मयात्रेच्या या सदरात यावेळी आम्ही तुम्हाला नेणार आहोत सांवेर येथे. रामभक्त हनुमानाच्या एका अशा मंदिरात जिथे हनुमानाच्या मूर्तीची स्थापना उलटी करण्यात आली आहे. आणि म्हणूनच संपूर्ण मालवा क्षेत्रात हे मंदिर उलटे हनुमानाच्या नावाने प्रसिद्ध आहे.

ऐतिहासिक नगरी असलेल्या उज्जैनपासून केवळ 15 किमी अंतरावर असलेल्या या मंदिराचा इतिहास रामायणकाळातील असल्याचे मानले जाते. मंदिरात शेदूरजडीत हनुमान मूर्तीचा चेहरा उलटा आहे.

webdunia
WD
एका पौराणिक कथेच्या आधारे सांगतात की जेव्हा अहिरावणाने प्रभू श्रीराम व लक्ष्मण यांचे अपहरण करून त्यांना पाताळात घेऊन गेला तेव्हा हनुमानाने पाताळात जाऊन अहिरावणाचा वध केला आणि श्रीराम-लक्ष्मणाची सुटका केली. भक्तांचा असा समज आहे, की पृथ्वीवरून पाताळात जाण्यासाठी हनुमानाने याच जागेतून प्रवेश केला. असे म्हणतात, की भक्तीला कुठल्याही तर्काची आवश्यकता नसते आणि म्हणूनच भक्तांनी या मंदिराची येथे स्थापना केली. मंदिरातील मूर्ती अत्यंत जागृत असल्याचे मानले जाते. मंदिर परिसरात अनेक साधू-संतांच्या समाधी आहेत. मंदिराच्या परिसरात इ. स. 1200 पर्यंतचा इतिहास स्पष्ट लक्षात येतो.

webdunia
WD
उलटे हनुमान मंदिर परिसरात पिंपळ, निंब, पारिजात, तुळस, वड आदी अनेक वृक्ष आहेत. अनेक वर्ष जुने दोन पारिजातकाची झाडेही येथे आहेत. पारिजातकाच्या झाडात हनुमानाचा वास असतो असतो असा सामान्य समज आहे. मंदिर परिसरातील झाडांवर पोपटाची दाट वस्ती आहे. पोपट हा पक्षी ब्राह्मणाचा अवतार असल्याचा समज आहे. हनुमानानेही संत तुलसीदास यांच्यासाठी पोपटाचे रूप घेऊन त्यांना श्रीरामाचे दर्शन घडवून आणले होते.

सांवेरच्या उलटे हनुमान मंदिरात श्रीराम, सीता, लक्ष्मण, शिव-पार्वती यांच्या मूर्ती आहेत. मंगळवारी हनुमानाला नवी वेषभूषा चढविली जाते. सलग तीन किंवा पाच मंगळवारी इथे येऊन हनुमानाचे दर्शन घेतल्यास आयुष्यातील कुठल्याही संकटांपासून मुक्ती मिळते अशी भक्तांची श्रद्धा असल्याने येथे भक्तांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते.

कसे जालः

रस्ता: उज्जैनपासून 15 किमी तर इंदूरहून 30 किमी अंतरावर आहे. येथे येण्यासाठी बस व टॅक्सी सहज उपलब्ध होते.

विमान मार्गे: इंदूर हे जवळचे विमानतळ असून तेथून मंदिर 30 कि. मी. अंतरावर आहे.

फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा.....

Share this Story:

Follow Webdunia marathi