कावेरी, कुदमूर्ती, वेन्नरू, वेट्टरू व वडावरू अशा पाच नद्या असलेल्या तिरूवइयरू या पावन स्थळी त्यागराज यांनी काही वर्ष वास्तव्य केले आहे. त्यागराज यांचा जन्म 6 जानेवारी, 1767 रोजी तिरूवरूर येथे झाला. त्यांनी कर्नाटिक संगीताचा विकास केला आणि त्याला श्रीरामाचा भक्तीमार्ग बनविले. त्यामुळे त्यांना एकदा तंजावरच्या राजाने दिलेला प्रस्ताव नाकारला होता. त्याचा त्यांच्या भावाला राग येऊन त्याने श्रीराम मूर्ती फेकून दिली होती. त्यागराज त्याच मूर्तीची पूजाअर्चा करीत होते. त्यानंतर ते तीर्थयात्रेला निघाले व दक्षिण भारतात भ्रमण करत असताना त्यांनी श्रीराम महिमा सांगणारे अभंग गायले.त्यानंतर त्यांनी तिरूवइयरू येथे निवास केला. तेथे एकदा त्यांना आंघोळ करताना नदीत कास्याची एक श्रीराम मूर्ती सापडली. ते त्याच मूर्तीची पूजा करत होते. त्यासोबत ते सीता व लक्ष्मणचीही पूजा करत होते. श्रीराम भक्त हनुमानाच्या मूर्तीजवळ बसून त्यांनी श्रीरामाचा महिमा सांगणारी भजने गायली. त्यांनी म्हटलेल्या पाच अभंगांना कर्नाटिक संगीतात सर्वोच्च स्थान आहे.
त्यागराज 80 वर्षी परेश्वराच्या चरणी विलीन झाले होते. ज्या जागी त्यांनी प्राण सोडले त्या जागी एक श्रीराम मंदिर आहे. त्यात त्यागराज पूजा करत असलेल्या श्रीराम, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्ती स्थापन करण्यात आल्या आहेत. या मंदिराच्या भिंतीवर त्यांनी गायलेले अभंग लिहिले आहेत.
कसे पोहचाल ?
रेल्वे मार्ग: तंजावर येथे चेन्नईहून येण्यासाठी भरपूर रेल्वे आहेत. तंजावरपासून तिरुवइयरू जवळच आहे.
रस्ता मार्ग: चेन्नईहून तंजावरसाठी भरपूर बस आहेत. तेथून तिरुवइयरूसाठी सहज बस उपलब्ध होते.
हवाईमार्ग: त्रिची जवळचा विमानतळ आहे. तेथून एक-दीड तासात तिरुवइयरू येथे पोहचता येते.