Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारतातील सर्वांत मोठे शनी मंदिर

-भीका शर्मा

भारतातील सर्वांत मोठे शनी मंदिर
धर्म यात्रेच्या या भागात आम्ही आपल्याला मध्य प्रदेशात असलेल्या देशातील सर्वांत मोठ्या शनी मंदिराविषयी माहिती देणार आहोत. विंध्याचल पर्वताच्या मनमोहक डोंगररांगेत हे मंदिर बाई नामक गावात आहे. मध्य प्रदेशाची आर्थिक राजधानी इंदूरपासून हे मंदिर केवळ 30 किलोमीटरवर आहे.

या मंदिराला फारशी मोठी ऐतिहासिक वा पौराणिक पार्श्वभूमी नाही. परंतु या मंदिराच्या स्थापनेची कथा मात्र अत्यंत रोचक आहे. मंदिरातील पुजारी नंदकिशोर मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, जयपूर येथील मधुबाला सुरेंद्रसिंह मीणा यांची सासुरवाडी या गावात आहे. स्वभावाने ते दानशूर होते. या भागात गरजूंसाठी एखादी धर्मशाळा असावी अशी त्यांची इच्छा होती.

WD
या धर्मशाळेच्या इमारतीचे काम सुरू करण्यात आलेच होते, खोदकाम करत असताना या भागात एक शनीची मूर्ती त्यांना सापडली. यानंतर मीणा यांनी गावकरी आणि विद्वज्जनांचे मत जाणून घेतले. अनेकांनी त्यांना या जागेवर धर्मशाळेऐवजी शनी मंदिर बांधण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांनी धर्मशाळेचा विचार बदलत या जागेवर शनी मंदिर बांधण्याचे निश्चित केले.

मंदिर बांधण्यासाठी दोन कोटी रुपयांचा खर्च आला आहे. 27 एप्रिल 2002 मध्ये मंदिरात शनी देवतेची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मंदिरात शनीसोबतच सूर्य, राहू, केतू, मंगळ, बुध, शुक्र, चंद्र, अशा नऊ ग्रहांची स्थापनाही करण्यात आली. मंदिरात उत्तर मुखी गणेश आणि दक्षिणमुखी मारुतीची स्थापना करण्यात आली आहे.

webdunia
WD
प्रत्येक वर्षी शनी जयंतीला येथे पाच दिवसांची यात्रा भरते. यात लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात शनी अमावास्येलाही या मंदिरात अनेक भाविक दर्शनाला येत असतात.

मंदिर देवस्थानाने गावात धर्मशाळा आणि शाळा तयार करण्यात मोलाचे सहकार्य केल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. श्रावण महिन्यात कावड यात्रेकरू ओंकारेश्वर महादेवावर जलाभिषेक करण्यासाठी या मार्गे जातात त्यावेळी शनी मंदिर ट्रस्ट या यात्रेकरूंची संपूर्ण व्यवस्था करते.

मंदिरासाठी जाण्याचा मार्ग :
इंदूरपासून 30 किलोमीटरवर हे मंदिर आहे. खांडव्यापासून 100 किमी आहे. या मार्गावरून आपल्याला मंदिराकडे जाण्यासाठी खाजगी वाहने मिळू शकतील.

रेल्वे मार्ग :
खांडवा इंदूर या मीटरगेज मार्गावरील चोरल या स्टेशनपासून 10 किमीवर हे मंदिर आहे.

हवाई मार्ग :
देवी अहिल्या विमानतळापासून हे मंदिर केवळ 40 किमी अंतरावर आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi