Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्तंभेश्वर महादेव

- अल्केश व्यास

स्तंभेश्वर महादेव
WD
धर्मयात्रेच्या या भागात आम्ही आपल्याला गुजरातमधील स्तंभेश्वर महादेव मंदिराचे दर्शन घडवत आहोत. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्यक्ष समुद्रच शिवशंभूला जलाभिषेक करतो.

webdunia
WD
गुजरातमधील भडोच जिल्ह्यात कावी नावाचे छोटेसे गाव आहे. समुद्रकिनारी वसलेल्या या गावात स्तंभेश्वर महादेवाचे मंदिर आहे. या गावाकडील किनार्‍यावर भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी मंदिराच्या आत येऊन शिवलिंगावर अभिषेक करून परत जाते. स्तंभेश्वराच्या या मंदिरात शिवलिंग आहे. समुद्र-देवता स्वत: येऊन त्याला अभिषेक घालते, अशी लोकांची समजूत आहे. भरतीच्या वेळी शिवलिंग पूर्णपणे जलमय होऊन जाते. प्रत्येक भरतीला हा प्रकार घडतो.

webdunia
WD
या मंदिरामागे एक दंतकथाही आहे. शंकराचा पुत्र कार्तिकेय सहा दिवसाचे असताना देवसेनेचे सेनापती म्हणून नियुक्त केले गेले होते. त्यावेळी तारकासुर नावाच्या दैत्याने देवांना भयभीत करून सोडले होते. देव, ऋषी, मुनी, सामान्य जनता त्रासले होते. कार्तिकेयाने या तारकासूराचा वध केला.

webdunia
WD
तारकासूर शंकराचा परमभक्त होता असे नंतर कार्तिकेयाला समजले. त्यामुळे व्यथित झालेल्या कार्तिकेयाने मनाची शांती मिळविण्यासाठी वधस्थळावर शिवमंदिर बांधावे, असे विष्णूंनी सुचविले. कार्तिकेयाने तसेच केले. समस्त देवगणांनी एकत्र येऊन महिसागर संगम तीर्थावर विश्वनंदक स्तंभाची स्थापना केली. पश्चिम भागात स्थापित स्तंभात शंकर स्वतः आहेत, असे लोक मानतात. म्हणूनच या तीर्थाला स्तंभेश्वर संबोधले जाते. येथे महिसागर नदीचा सागराशी संगम होतो.

स्तंभेश्वर महादेव मंदिरात दर महाशिवरात्री आणि अमावस्येला यात्रा भरते. प्रदोष, पौर्णिमेला संपूर्ण रात्र येथे पूजा-अर्चना सुरू असते. कानाकोपर्‍यातून भाविक येथे शिवशंभूच्या जलाभिषेकाचे अलौकिक दृश्य पाहण्यासाठी येतात.

फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा....

Share this Story:

Follow Webdunia marathi