खंडोबाचे मंदिर दोन भागात आहे. पहिल्या भागात मंडप तर दुसर्या भागात गर्भगृह आहे. मंडपात भाविक सामूहिक पूजाअर्चा करतात. गर्भगृहात खंडोबाची चित्ताकर्षक मूर्ती विराजमान आहे. खंडोबाचे मंदिर हेमाडपंथी असून मंदिरात 10X12 फुट आकाराचे पितळी कासव आहे. मंदिर परिसरात ऐतिहासिक शस्त्रेही ठेवण्यात आली आहेत. विजयादशमीला येथील तलवार अधिक वेळ उचलण्याची स्पर्धा घेतली जाते. येथील ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. जेजुरी या गावाला ऐतिहासिक वारसाही आहे. शिवाजी महाराज व त्यांचे वडील शहाजी राजे येथे बर्याच वर्षांच्या अंतराने भेटले होते. त्या काळी जेजुरी हा दक्षिण प्रांतातील एक मुख्य किल्ला होता.
मध्य प्रदेशातील अहिल्याबाई होळकर यांच्या घराण्याचे जेजुरीचा खंडोबा हे कुलदैवत होते. मराठी महिन्यानुसार चैत्र, मार्गशीर्ष, पौष व माघ महिन्यात येथे भव्य यात्रा भरते. यावेळी लाखो भाविक जेजुरीला येत असतात.
कसे पोहचाल?
महामार्ग:
जेजुरी पुणे येथून अवघ्या 40 किलोमीटरवर असून पुण्याहून जेजुरीला जाण्यासाठी बस किंवा खाजगी वाहन सहज उपलब्ध होते.
रेल्वेमार्ग:
पुणे-मिरज रेल्वे मार्गावर जेजुरी हे रेल्वे स्थानक आहे.
हवाईमार्ग:
जेजुरीपासून सगळ्यात जवळचे विमानतळ पुणे येथे आहे.