वागिश्वरी लंडनमध्ये
या ठिकाणी एके काळी सरस्वती देवीचे मंदिर असल्याचा उल्लेख कवी मदनने आपल्या नाटकात केला आहे. येथील मूर्ती भव्य आणि विशाल होती. देवीची मूर्ती इंग्रज आपल्यासोबत घेऊन गेले. आजही ती मूर्ती लंडनच्या संग्रहालयात आहे. या मूर्तीची राजा भोजद्वारे आराधना केली जात होती. वर्षातून एकदाच वसंत पंचमीला सरस्वती देवीचे तैलचित्र नेऊन तिची आराधना केली जाते. हा उत्सव वसंत पंचमीलाच साजरा केला जातो.
भोजशाळा ही ऐतिहासिक इमारत असल्यामुळे केंद्रीय पुरातन विभागाकडे सोपविण्यात आली आहे. या इमारतीसाठी केंद्र सरकारच्या मंत्रालयाने विशेष आदेश दिले आहेत. त्या अंतर्गत वर्षातून एकदा येथे वसंत पंचमीला हिंदू समाजाला पुजा-पाठ करण्याची संमती दिली आहे.
प्रत्येक मंगळवारी हिंदू समाजाचे लोक अक्षता आणि फुले घेऊन सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत प्रार्थना करू शकतात. त्याचप्रमाणे प्रत्येक शुक्रवारी येथे मुस्लिम समाजासाठी नमाज अदा करण्याची संमती दिली आहे. या दिवशी प्रवेश नि:शुल्क असतो. मात्र इतर दिवशी येथे प्रति व्यक्ती 1 रुपया शुल्काच्या देऊन प्रवेश दिला जातो. मुलांना शुल्काशिवाय प्रवेश मिळतो.
कसे पोहचाल?
इंदूरहून धारला जाण्यासाठी प्रत्येक पंधरा मिनिटात बस उपलब्ध आहेत. इंदूर पासून धार शहर 60 किमी अंतरावर आहे. इंदूर-अहमदाबाद राष्ट्रीय राजमार्गावर असेलेले धार, रतलाम रेल्वे जंक्शनपासून 92 किलोमीटर अंतरावर आहे. धारच्या बस स्थानकापासून भोजशाळेत ऑटो रिक्शाने सहज पोहचता येते.