Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भोपावरचे पुरातन शांतिनाथ मंदिर

- गायत्री शर्मा

भोपावरचे पुरातन शांतिनाथ मंदिर
मध्य प्रदेशातील भोपावर येथे जैन धर्मियांचे पुरातन शांतिनाथ मंदिर आहे. इंदूर-अहमदाबाद राष्ट्रीय राज्यमार्गावरील राजगडपासून 12 किलोमीटरवर हे मंदिर आहे. या मंदिराला महाभारताचा वारसा लाभला आहे. 16 वे जैन तीर्थंकर श्री शांतिनाथजींची 12 फुटाची उभी पुरातन प्रतिमा येथे आहे. हे मंदिर म्हणजे पुरातन कलाकुसरीचा उत्कृष्ट नमुना आहे.

भोपावरची स्थापना कृष्णाची पत्नी रूक्मिणीच्या भावाने रूक्मणकुमाराने केली होती. रूक्मणकुमारचे वडील भीष्मक येथून 17 किलोमीटरवर असलेल्या अमीझरा येथील राजा होते. रूक्मणकुमारची बहिण रूक्मिणीचा विवाह शिशुपालसोबत व्हावा अशी त्याची इच्छा होती. मात्र, रूक्मिणीने श्रीकृष्णाचा पती म्हणून ‍स्वीकार केला होता. रूक्मिणीचा संदेश मिळताच कृष्णाने तिचे हरण केले होते. रस्त्यात कृष्णाला रूक्मणकुमारशी दोन हात करावे लागले. त्यात रूक्मणकुमारचा पराभव झाला. पराभूत झालेला रूक्मणकुमार दु:खी होऊन कुंदरपुरला परतलाच नाही. त्यांनी त्याच जागी एक नवीन नगर स्थापन केले. तेच आज भोपावर नावाने प्रसिद्ध आहे. येथील श्री. शांतीनाथजी मंदिरात रूक्मणकुमार यांची प्रतिमा स्थापन करण्यात आली आहे.

WD
मथुरेच्या कंकालीटीकाजवळ पुरातन जैन स्तूप आहे. त्याला देवनिर्मित स्तूपही म्हटले जाते. तेथील शिलालेखात कृष्णकालीन मूर्तीविषयी उल्लेख आला आहे. त्यात भोपावर येथील श्री.शांतीनानजी मंदिरातील विशालकाय मूर्तीचाही उल्लेख आहे.

हे मंदिर चमत्कारीक असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. तसे चमत्कारीक प्रसंगही येथे घडत असल्याचे बोलले जाते. येथे दरवर्षी मंदिर परिसर एखादा नाग कात सोडून जात असतो. ही घटना तर गेल्या अनेक वर्षांपासून नियमित घडत आहे. मंदिरात अनेक नागांच्या कात सुरक्षित ठेवण्यात आले आहे.

कसे पोहचाल :

महामार्ग: इंदूरपासून भोपावर हे 107 किलोमीटरवर आहे. भोपावरला जाण्यासाठी बस किंवा खाजगी वाहन सहज उपलब्ध होते.

रेल्वे मार्ग: भोपावरपासून सगळ्यात जवळचे रेल्वेस्थानक मेघनगर येथे आहे. तेथून 77 किलोमीटरवर भोपावर आहे. तेथून बस व टॅक्सी सहज उपलब्ध होते.

हवाई मार्ग: येथून जवळचा विमानतळ इंदूर येथे आहे. इंदूरपासून 107 किलोमीटरवर भोपावर आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi