Article Marathi Religious Articles %e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%be %e0%a4%ac%e0%a4%97%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96%e0%a5%80 108110300001_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मांत्रिकांची माता बगलामुखी

- अनिरुद्ध जोशी

मांत्रिकांची माता बगलामुखी
प्राचीन ग्रंथात दहा महाविभुतींचा उल्लेख आलेला आहे. त्यातील एक म्हणजे बगलामुखी देवी. देवांची देवी म्हणून बगलामुखी देवीला महत्त्व प्राप्‍त झाले आहे. बगलामातेची देशात फक्त तीन ठिकाणीच प्राचीन मंदिरे आहेत. त्यांना सिद्धपीठ म्हटले जाते.

दतिया (मध्य प्रदेश), कांगडा (हिमाचल) व नलखेडे (मध्य प्रदेश) येथे मातेचे भव्य सिध्दपीठे आहेत. तिन्ही मातांचे वेगवेगळे महत्त्व आहे. धर्मयात्रेच्या या भागात आम्ही आपल्याला मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्यातील नलखेडे येथील प्राचीन सिध्द‍पीठात घेऊन जात आहोत, तेथे बगलामुखी देवीचे भव्य मंदिर आहे.

WD
तीनमुखी त्रिशक्ति बगलामुखी देवीचे मंदिर मध्य प्रदेशातील नलखेडे येथे लखुंदर नदीच्या काठी स्थित आहे. द्वापार युगातील हे मंदिर अत्यंत जागृत मानले जाते. त्यामुळे देशभरातील तांत्रिक-मांत्रिक, साधू-संत अनुष्ठान करण्यासाठी येथे येत असतात.

मंदिरात बगलामुखी देवीव्यतिरिक्त लक्ष्मी, श्रीकृष्ण, हनुमान, भैरवनाथ व सरस्वतीच्या मुर्ती येथे आहेत. महाभारतात विजय मिळविल्यानंतर भगवान श्रीकृष्णाच्या आदेशाने महाराज युधि‍ष्ठिर यांनी या मंदिराची स्थापना केली होती. बगलामुखी देवीची मूर्ती स्वयंभू असल्याची देखील आख्यायिका आहे.

webdunia
WD
मंदिराचे पुजारी कैलाश नारायण शर्मा यांनी सांगितले की, बगलामुखी मातेचे हे फार प्राचीन मंदिर आहे. दहा पिढ्यांपासून येथे शर्मा पुजापाठ करत आहेत. 1815 साली या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला होता. भाविक मनोकामना पूर्ण करण्यासाठी येथे येत असतात.

येथील पुजारी गोपालजी पंडा, मनोहरलाल पंडा आदींनी सांगितले, की हे मंदिर स्मशानभूमीत आहे. बगलामु्‍खी देवी मुळात तांत्रिक, मांत्रिकांची देवी आहे. त्यामुळे येथे तांत्रिक अनुष्ठानाला अधिक महत्त्व आहे. संपूर्ण विश्वात मातेची तीन मंदिरे आहेत परंतु, येथील मंदिराचमहत्त्व काही वेगळआहे. कारण येथील मातेची मुर्ती स्वयंभू आहे व स्वत: महाराज युधिष्ठिर यांनी मंदिराची स्थापना केली आहे.

मंदिरात बेलपत्र, चमेली, आवळा, लिंब व पिंपळाचे झाड आहे. मंदिर परिसरात सुंदर बगिचा आहे. नवरात्रोत्सवात भाविकांची दर्शनासाठी रिघ लागलेली असते. परंतु, मंदिर स्मशानभूमीत असल्याने येथे वर्षभर कमीच भक्त दिसतात.

कसे पोहचाल -
हवाई मार्ग:- नलखेडे येथे जाण्यासाठी सर्वांत जवळ इंदूर येथे विमानतळ आहे.

रेल्वे मार्ग- इंदूर येथे रेल्वे स्थानक आहे. येथून देवास किंवा उज्जैन येथे जाण्यासाठी रेल्वे गाडी मिळते. देवास किंवा उज्जैन येथून शाजापुर जिल्ह्यातील नलखेडे येथे बस किंवा खाजगी वाहनाने जाता येते.

महामार्ग- इंदूर येथून साधारण 165 कि.मी. अंतरावर असलेल्या नलखेडे या गावासाठी सहज बस मिळते. तसेच देवास व उज्जैन येथून देखील बगलामुखी मातेच्या मंदिरात जाण्यात खाजगी वाहन सहज उपलब्ध होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi