Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पहिल्या राष्ट्रपतींची निवडणूक

पहिल्या राष्ट्रपतींची निवडणूक
ND
राज्यघटनेचा मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी मंजूर झाल्यानंतर २६ जानेवारी १९५० या दिवशी भारत प्रजासत्ताक देश ओळखला जाऊ लागला. संसद भवनात प्रसिद्ध पत्रकार शैलेन चटर्जी यांच्या उपस्थितीत राज्य घटनेचा मसुदा मंजूर केला होता. सर्व सदस्यांनी बाके वाजवून राज्यघटना मंजूर केली होती. संसद भवन 'वंदे मातरम्' आणि 'भारत माता की जय' या घोषणांनी गाजले होते.

राज्य घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी आपल्या भाषणात राज्यघटनेचा प्रस्ताव आणि महात्मा गांधीना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर राज्यघटना समितीने 'जन गण मन...' या राष्ट्रगीताबरोबर ऐतिहासिक सत्र समाप्त झाले. राष्ट्रगीत स्वातंत्र्य सैनिक स्व. अरूणा असफ अली यांची बहीण पोर्णिमा बॅनर्जी यांनी गायले होते. मसुदा समितीने २४ जानेवारी १९५० रोजी विशेष सत्रात डॉ. राजेंद्रप्रसाद यांना स्वतत्र भारताचे राष्ट्रपती म्हणून निवडले गेले आणि २६ जानेवारी १९५० ला प्रजासत्ताक गणराज्य झाले.

सध्या अस्तित्वात असलेला राष्ट्रपती भवनाचा दरबार हॉल २६ जानेवारी १९५० रोजी पाचशे पाहुण्यांनी भरगच्च भरला होता. तेव्हा त्याला गर्व्हमेंट हाऊस असे म्हटले जात होते. अंगात काळा कोट आणि डोक्यावर गांधी टोपी घातलेल्या डॉ. राजेंद्रप्रसाद यांना सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश हिरालाल कनिया यांनी स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून हिंदीत पद व गोपनीयतेची शपथ दिली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi