Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रजासत्ताक दिनी सावधगिरी आवश्यक

पं.अशोक पवार 'मयंक'

प्रजासत्ताक दिनी सावधगिरी आवश्यक
WDWD
सालाबादाप्रमाणे यंदाच्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीत भारताच्या प्रथम नागरिक व पहिली महिला राष्ट्रपती राष्ट्रपति प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवणार असून तिनही सैन्य दलाच्या वतीने राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात येणार आहे.

26 जानेवरी, 2001 चा दिवस आजही आपल्या अंगावर शहारा आणतो. त्या दिवशी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील किल्लारी गावात भीषण भूकंप येऊन शेकडो नागरिकांच्या संसाराची राखरांगोळी केली होती. आपल्या हृदयावरील ती जखम अजून ताजीच असून 2008 मध्ये देशाची आर्थिक राजधानी मुंबई झालेल्या सगळ्यात मोठ्या हल्ल्याचे अद्याप पुरावे शोधण्यात वेळ घालवत आहे.

आपल्या देशाच्या राजकीय पुढारी केवळ तोडातून वाफा सोडण्यातच पटाईत आहेत. आपण किती वेळ अमेरिकेच्या सांगण्यावरून चालणार आहोत. अशा स्थिती आपणच काही तरी करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आपल्या राष्ट्रपतींनीच विधायक पाऊल उचलायला हवे. तेव्हाच आपण देशाचे काही तरी देणे लागतो याची कल्पना भारतीय नागरिकांना येईल. एकूनात ग्रहांच्या स्थितीवरून असे लक्षात येत आहे की, आपण केवळ डंका पिटायचे काम करत आहोत.

यंदा मकर लग्नाचा उदयन काळ सुरू आहे. लग्नात वक्री द्वितीय तसेच नवव्या स्थानातील स्वामी बुधसोबत आहे. चंद्र सप्तमेश मार्केश होऊन तृतीय व द्वादश स्थानाचा स्वामी गुरु सोबतच अष्टम स्थानातील स्वामी सूर्यसह राहु ही आहे. त्यात अमावस्या आहे. शनी तेथे लग्नेश आहे त्यात द्वितीयेश ही आहे. तो मार्केश होऊन अष्टम स्थानात खडतर होऊन अतिशत्रु आपल्या पिता सूर्यच्या राशीत विराजमान आहेत.
webdunia
WDWD

मंगळ द्वादशमध्ये मित्र राशी धनुमध्ये रूपांतरीत होऊन सप्तम मारक चंद्रावर अष्टम दृष्टीतून पाहत असल्याने अशुभ स्थिति निर्माण झाली आहे. कुठली ती अशुभ घटना किंवा प्रसंग होणर्‍याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने उपाययोजना म्हणून सावधगिरी बाळगायला हवी. षष्ट शत्रु स्थानातील स्वामी लग्नात खडतर आहे. ग्रहांची स्थिति ठिक नसल्याने आपली लहान चूक ही आपल्याला मोठी नुकसानदायक ठरू शकते.

जेथे गुरु व चंद्र गजकेसरी योग निर्माण करत आहेत, तेथे सूर्य व चंद्र असल्याने अमावस्या योगसह ग्रहण योग ही आहे. सूर्य-राहु सोबत असल्याने ग्रहन स्थिती निर्माण होत असते. तसेच यंदा दि. 26 जानेवरीला ग्रहण असल्याने ग्रहण काळात होणारी कुठलीच गोष्ट आपल्यासाठी शुभ नाहीच.

Share this Story:

Follow Webdunia marathi