Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खादी देते चांगला 'लूक'

खादी देते चांगला 'लूक'
NDND
जानेवारी महिना म्हणजे गुलाबी थंडीचा शेवटचा महिना. यानंतर हळूहळू उन्हाळ्याची चाहूल लागते. फेब्रुवारीत तापमान वाढू लागते आणि संध्याकाळ थंडीच्या दिवसासारखीच गुलाबी वाटू लागते. अशावेळी लोक खादीचा फॅशन म्हणून वापर करतात. हीच खादी एकेकाळी भारताच्या राष्ट्रीय भावनेची ओळख होती आणि आजही आहे. अनेक प्रकारच्या सामाजिक आंदोलनाशी खादीचे नाते जोडले आहे. परंतु, आजचा युवक खादी एक नवीन फॅशन म्हणून वापरताना दिसून येतो.

खादीची विशेषता म्हणजे ती उन्हाळ्यात थंड व थंडीत गरम होते. त्यामुळे खादी दोन्हीं मोसमात बिनधास्तपणे वापरली जाते. खादी एक शानदार वस्त्र मानले जाते.

आपण कल्पनादेखील करू शकणार नाहीत एवढ्या प्रकारची खादी बाजारात उपलब्ध आहे. कोसा सिल्क, मटका खादी, टसर, मूंगा इत्यादी प्रकारांचे नावे आहेत. याशिवाय बालूचरी, इंडीचायना रूपातील खादी आपणाला पाहायला मिळेल. खादी आपल्या व्यक्तीमत्वाला एक प्रकारचा वेगळा लुक देते.

webdunia
NDND
१९४० च्या दशकात खादी राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक होते. त्यावेळी भारताने स्वदेशीचा नारा देऊन विदेशी वस्तूंवर बहिष्कार घालून खादी अस्मितेचा विषय मानला होता. आता इतक्या वर्षानंतरही खादीची लोकप्रियता कमी झाली नाही. भारतातच नाही तर विदेशातही खादीची लोक‍प्रियता वाढली आहे.

राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखल्या जाणार्‍या खादीला आता फॅशन डिझायनरनेही पहिली पसंती दिली आहे. पहिल्यांदा खादी केवळ कवी, लेखक आणि पत्रकार लोकांपुरतीच मर्यादीत होती. आता तसे राहीले नाही. आता रॅंपवर चालणारा उत्कृष्‍ट मॉडेलदेखील खादी पसंत करतो. उन्हाळ्यात खादीचा वापर केला नाही तर तिच्याबरोबर अन्याय केला जाईल असे म्हणायला हरकत नाही.

खादीपासून तयार केलेले कपडे आकर्षक असतात आणि व्यक्तीमत्त्व त्यात उठून दिसते. आपण कोणत्याही वयात खादी स्टाइलशीर वापरू शकतात. ती प्रत्येक रूपात आपल्याला शोभून दिसेल.

प्रजासत्ताक दिनाच्या फोटो गॅलरीसठी येथे क्लिक करा ......

Share this Story:

Follow Webdunia marathi