यावेळी प्रथमच अशोक स्तंभ हे राष्ट्रीय चिन्ह दरबारात आणले गेले. ब्रिटीश सरकारच्या काळात व्हॉइसरॉय बसत असलेल्या गादी शेजारी अशोकस्तंभ ठेवण्यात आला. तसेच गौतम बुद्धाची प्रसन्न प्रतिमा गादीमागे पहिल्यांदाच ठेवण्यात आली. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी दरबार हॉमध्ये राष्ट्रपती पदाची शपथ घेतल्यानंतर लोकांना अभिवादन केले. आपल्या सर्वांसाठी हा एक अवस्मरणीय क्षण असून आपण राष्ट्रपिता व इश्वराचे आभार मानून सुरवात करू असे डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी हिंदी आणि इंग्रजीत केलेल्या भाषणात सांगितले होते.
राष्ट्रपित्याने जगाला अहिंसेचा मार्ग दाखवला. त्या दिवशी देशवासियांनी पहिला प्रजासत्ताक दिन प्रभात फेरी काढून साजरा केला. दिल्लीत कडाक्याची थंडी असूनही लहान लहान चिमुकलेदेखील घराबरोबर पडले होते. त्यांनी हा राष्ट्रीय सण आनंदाने साजरा केला होता.