Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घटनेतील काही बाबी

घटनेतील काही बाबी
NDND
घटना समितीची पहिली बैठक सोमवार दिनांक ९ डिसेंबर १९४६ ला सकाळी अकरा वाजता सुरू झाली. या बैठकीला २१० सदस्य उपस्थित होते. ११ डिसेंबर १९४६ ला या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. राजेंद्रप्रसाद यांची निवड झाली. शेवटपर्यंत या पदावर तेच होते. १३ डिसेंबर १९४६ ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घटनेचा मसुदा सभेत मांडला. २२ जानेवारी १९४७ ला तो मंजूर करण्यात आला.

या मसुद्यातील काही महत्त्वाच्या बाबी.

१. भारत एक सार्वभौम प्रजासत्ताक असेल. तो आपली घटना स्वतः बनवेल.
२. सध्या ब्रिटीश भारतात व संस्थानांत असलेला सर्व भाग भारतीय संघराज्यात सामील असेल. याशिवाय या दोन्हीत नसलेला पण जो भारतात सामील होऊ इच्छित असेलला भाग भारतात सहभागी केला जाईल.
३. भारतीय संघराज्यात तसेच त्याच्या विविध विभागांत सत्तेचा मूळ स्त्रोत जनता असेल.
४. भारताच्या नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, पद, संधी आणि कायद्याची समानता, विचार, भाषण, विश्वास, व्यवसाय, संघटना निर्माण व कार्याचे स्वातंत्र्य कायद्याच्या किंवा सार्वजनिक नैतिकतेंतर्गत प्राप्त होईल.
५. अल्पसंख्य, मागास जाती व भटक्या जातींच्या हितांचे रक्षण करण्यासाठी योग्य व्यवस्था केली जाईल.
६. अविशिष्ट अधिकार प्रदेशांकडे रहातील.

प्रजासत्ताक दिनाच्या फोटो गॅलरीसठी येथे क्लिक करा ......

Share this Story:

Follow Webdunia marathi