Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सावधान, रामदासस्वामी आणि डॉ. यादव

सावधान, रामदासस्वामी आणि डॉ. यादव
NDND
महाबळेश्वरची निसर्गरम्य भूमी सृजनासाठी पोषक असली तरी सृजनत्व देणार्‍या साहित्यिकांना मात्र ती फारशी लाभत नसावी की काय अशी चर्चा सध्या संमेलनस्थळी सुरू आहे.

त्यात साहित्य संमेलनाच्या मुख्य व्यासपीठाला संत रामदासांचे नाव देण्यात आल्याने या चर्चेला काहीसे बळही मिळाले आहे. नारायण ठोसर अर्थात पुढे प्रसिद्धीस पावलेले समर्थ रामदासस्वामी लग्नाच्या बोहल्यावरून सावधान हे शब्द ऐकताच पळून गेल्याची कथा सर्वश्रुत आहे. लग्नाची बेडी काही रामदासांना मानवली नव्हती. काही जण त्या घटनेचा सबंध या संमेलनाशीही जोडू पहात आहेत.

webdunia
PRPR
इथेही वारकर्‍यांनी आंदोलनाचा इशारा देताच 'सावधान' झालेल्या डॉ. आनंद यादवांनी आधी आपलेच अपत्य असलेली कादंबरी नाकारली आणि मग अध्यक्षपदाचा 'बेडी'तून पळ काढल्याची चर्चा सध्या रंगली आहे. विशेष म्हणजे माजी संमेलनाध्यक्ष म. द. हातकणंगलेकरही आज नाराज होऊन आल्या पावली परत गेल्याने हे व्यासपीठ संमेलनाध्यक्षांना लाभत नसल्याची चर्चामहाबळेश्वरचे थंड तापमान तापवित आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi