Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अशी ठेवा बैठकीची खोली

अशी ठेवा बैठकीची खोली
WD
बैठकीची खोली घरातील महत्त्वाची जागा असते. येथे लोकांचे येणे जाणे सुरूच असते व लोक तुमच्या स्वभावाचा अंदाज या खोलीला पाहून करतात.

या खोलीतील दारे, खिडक्या चमकदार करण्यासाठी त्यावर लिंबू लावून एखाद्या बारीक कपड्याने स्वच्छ पुसून काढाव्यात.

टी टेबल काचेचे असेल तर त्यावर थोडंसं पाणी टाकून वर्तमानपत्राने रगडून काढावे. सर्व डाग दूर होतील.

फुलदाणीला चमकदार बनविण्यासाठी त्यावर लिंबू रगडून काही वेळ तसेच सोडून द्यावे. क्रिस्टलला चमकदार बनविण्यासाठी सरसोची (मोहरी) पावडर आणि वनस्पती तेलाच्या पेस्टने स्वच्छ करावे.

ड्रॉइंग रूम किंवा पूजेत ठेवलेल्या चांदीच्या भांड्यांना चमकदार बनविण्यासाठी बेसनात लिंबाचा रस मिसळून लावला पाहिजे. लाकडाच्या फर्निचरवर ओरखडे उमटले असतील तर कॉड लिव्हर ऑइल लावून ठेवावे व दुसर्‍या दिवशी त्या जागेला स्वच्छ केले पाहिजे.

बैठकीच्या खोलीतील कारपेट खराब झालं असेल किंवा त्यावर डाग पडले असतील तर त्या भागावर बटाटा रगडावा. नंतर गरम पाण्याने भजलेल्या कापडाने पुसून काढावे.

भिंतीवर खिळा ठोकण्याअगोदर त्याला गरम पाण्यात बुडवून ठेवले पाहिजे व नंतर त्याला ठोकले पाहिजे त्यामुळे भिंतीचे प्लॅस्टर पडत नाही. फ्रेम चांगली लावता येते.

तुमच्या कॉम्प्युटरच्या की-बोर्ड किंवा माऊसवर डाग पडले असतील तर त्यावर नेलपेंटचे रिम्हूवर लावून कापसाने पुसून काढावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi