Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऑनलाईन शॉपिंग करा पण समजूतदारपणे....

ऑनलाईन शॉपिंग करा पण समजूतदारपणे....
* विश्वसनीय इ-कॉमर्स वेबसाइट्स किंवा ऑनलाईन स्टोअर्सहूनच खरेदी करा.
 
सर्वात आधी हे ठरवून घ्या की आपल्याला काय वस्तू खरेदी करायची आहे आणि त्यासाठी बजेट काय आहे.


 
कोणतीही वस्तू ऑर्डर करण्याआधी ऑनलाईन सर्व्हे करून घ्या.

* इलेक्ट्रॉनिक वस्तू घेयची असल्यास दोन-तीन वेगळे-वेगळे ब्रँड आणि त्यांची कंम्पॅरिझन करून घ्या. 

कोणतेही प्रॉडक्ट खरेदी करण्यापूर्वी त्याचे रिव्यू वाचून घ्या. ज्याने त्या प्रॉडक्टची विशेषता आणि विसंगती कळून येईल.

webdunia


कोणतीही वस्तू घेण्याआधी त्या साईट्सची रिर्टन पॉलिसीबद्दलही जाणून घ्या.

* कपडे आणि जोडे खरेदी करताना साइजबद्दल बारकाईने वाचू घ्या. सगळ्या चांगल्या साईट्सवर साइज डिस्क्रिपशन असतं.

खाण्या-पिण्याचं सामान, औषधे, कॉस्मेटिक व इतर वस्तूंची एक्सपायरी डेट बघूनच ऑर्डर प्लेस करा.

webdunia

 
ऑफरमध्ये खरेदी करण्याआधी इतर चांगल्या वेबसाइट्सवरही व्हिजिट करा.

* डिलेवरी मिळाल्यावर पॅकिंग खोलताना त्याचे फोटो किंवा व्हिडिओ बनवून घ्या. चुकीचा प्रॉडक्ट किंवा आणखी काही धोका झाल्यास आपल्याकडे प्रूफ राहील.
 
खरेदीची स्लिप, ऑर्डर नंबर, पॅकेट सर्व जतन करून ठेवा.

webdunia
 

Share this Story:

Follow Webdunia marathi